उपासना करताना… – Upasana

उपासना हे प्रयत्न वादाचेच एक अंग समजून उपासना करावी.

उपासना करणे म्हणजे व्यावहारिक प्रयत्न सोडून उपासना करीत बसने अथवा केवळ त्याच्याच मागे लागणे ही गोष्ट अतिशय अयोग्य आहे. प्रयत्न हा केलाच पाहिजे पण प्रयत्नात लवकर यश मिळावे म्हणून उपासन करावी.

मनुष्याने कोणतीतरी उपासन सदैव चलू ठेवावी हे अतिशय महत्वाचे आहे. मात्र उपासना हे सदैव चांगल्या कार्यासाठी असावी. चांगल्या पवित्र हेतूने आणि सदाचारी मार्गाने केलीगेलेली उपासना कायमच उत्तम फळ देते.

उपासनेने उपास्य देवतेकडून सदैव रक्षण आणि सहाय्य लाभते. उपासना जर बालपणापासून कोणी करत असेल तर ते पुर्वकर्माचेच सत्फल आहे असे समजावे.

१) मुख्यतः कोणी कोणती उपासना करावी हे कुंडलीतील नव-पंचम स्थानातील ग्रहाधीपतींच्या अनुसंधानाने शास्त्रोक्त रीतीने ठरवून ती आचरणात आणणे चांगले.

२) अथवा एका साक्षात्कारी सत्पुर्षाने आपले निरीक्षण करून सांगितलेल्या देवतेची त्याने दिलेल्या मंत्राने – साधनेने – उपासन सुरु ठेवणे योग्य असते.

३) असे होत नसल्यास आपल्या कुल्देवतेची अथवा कुलात परंपरेने चालत आलेल्या देवतेची उपासना चालू ठेवणे हितावह होते.

४) काही विशिष्ठ हेतुकरिता मात्र विशिष्ठ स्वरूपाच्या उपासना कराव्या लागतात आणि त्यापूर्वी त्या आपल्या कुलपरंपरेत नसल्या तरी त्या करण्यास हरकत नाही.

सर्वसामान्य उपासनेचे प्रकार

दररोज स्नान केल्यावर भागवत, रामायण, देविपुराण, सप्तशती, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, शिवलीलामृत, दासबोध ह्यापेकी कोणाचेही अध्ययन, पठन अथवा होतील तितके श्लोक अथवा ओव्या वाचून ते पूर्ण करणे असा नियम ठेवावा.

गुरुचरित्र, सत्पुर्षांचे ग्रंथ, गजानन महाराज, स्वामी समर्थ ह्यांचे ग्रंथ, दत्तश्रीलीलामृत, दत्तम्हात्म्य, गणेशपुराण इत्यादी अश्या ग्रंथांचे नित्य पठन किंवा गणपती अथर्वशीर्ष दररोज २१, ४१, १०८ पाठ अथवा गायत्री मंत्र १०८, २५१, ५०१ वेळा जप करावा.

शनि, मंगळ, राहू, केतु, नेपचून, रवि, चंद्र, गुरु, शुक्र, – ग्रह दोष निवारणासाठी बर्याच वेळा वेगळी उपासना करावी लागते.

कुलदेवतेची उपासना जी आपण रोज करतो ती उपासना कायम करावयाची असते. ग्रह दोष निवारणासाठी सांगितलेली उपासना ही बर्याच वेळा काही काळापुरतीच असते, कायमची नव्हे.

सर्वात महत्वाचे विसरू नका!

सर्वात महत्वाचे की आपण वरील दिलेलेया ‘उपासना करताना ध्यानात ठेवावयाच्या गोष्टी’ लक्ष्यात घ्याव्यात आणि मगच उपासना सुरु करावीत.

आपले स्वतःचे कुलदैवत आपण विसरता कामा नये. त्याची उपासना ही प्रथम करावी.

आपला,

विकी – Vickram Aadityaa

ipv-linkedin2