Moon Signs – राशीभविष्य २०१४

aries-mesh  taurus-vrushabh  leo-simha  libra-tul  scorpio-vrushchik  sagittarius-dhanu  aquarius-kumbha  capricorn-makar  cancer-karka  pisces-meen  gemini-mithun  virgo-kanya

राशीभविष्य २०१४ (मून साइन्स) वर आधारित आहे

मेष राशीभविष्य २०१४

मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सुखाचे असेल. राशीभविष्य २०१४ नुसार कौटुंबिक जीवन सुखी असेल. परंतु शनि व राहू सप्तम स्थानात असल्यामुळे आपल्या पती / पत्नी बरोबर काही मतभेद होण्याचे संकेत आहेत. यामुळे, आपल्या पती / पत्नीला आरोग्यविषयक तक्रारी देखील ग्रासू शकतात. राशीभविष्य २०१४ सांगते की यावर्षी तुम्ही स्वास्थ्य विषयक उतार चढाव अनुभवाल. रोगांपासून काळजी घेणे आवश्यक आहे. तुमचे प्रेमजीवन या वर्षी खुलून येईल. परंतु हा काळ अंतर जातीय प्रेम संबंधांसाठी उपयुक्त नाही. त्यामुळे, तुमच्या प्रेमाची व्यक्ती जर दुसऱ्या जातीची असेल, तर सावध राहणे गरजेचे आहे. व्यवसाय-धंद्यामध्ये भरभराट होईल. आर्थिक दृष्ट्या हे वर्ष समाधानाचे असेल. उच्च शिक्षणासाठी हा काळ उपयुक्त आहे, चांगले निकाल मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे असेल, त्यांच्यासाठी जून २०१४ नंतरचा काळ हितवाह ठरेल. कृष्ण वर्णीय गायीची सेवा करावी, ज्याने मनोकामना पूर्ण व्हायला मदत होईल.

वृषभ राशीभविष्य २०१४

वृषभ राशीच्या लोकांसाठी २०१४ मध्ये खूप आश्चर्ये दडलेली आहेत. तुम्ही आपल्या स्वजनांसाठी काही खास नियोजन कराल, ज्यामुळे तुमचे नावलौकिक वाढेल. जर यापूर्वी तुमचे स्वास्थ्य उत्तम राहिले असेल, तर २०१४ हे आरोय्ग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी सुखाचे जाईल. जर तुम्हाला एखादा जुना आजार त्रास देत असेल, तरी या वर्षी त्यात नक्की सुधारणा होईल. प्रेमजीवन उत्तम असेल, काही बारीकसारीक मतभेद वगळता. राशीभविष्य २०१४ सांगते की वाद टाळणे उपयुक्त ठरेल. राशीभविष्य २०१४ च्या अंदाजाप्रमाणे हे वर्ष नोकरी धंद्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असेल. नोकरी शोधणार्यांना नोकरी मिळेल, परंतु व्यापार धंद्यात गुंतलेले असाल, तर भरपूर परिश्रमाशिवाय फळ मिळणार नाही. कठोर परिश्रमाला मात्र नक्की चांगले फळ मिलेल. आर्थिक दृष्ट्या २०१४ अनुकूल असेल. राशीभविष्य २०१४ सांगते की पहिल्या सहा महिन्यात पैसे वाचविण्याची उत्तम संधी आहे. त्याउलट, वर्ष्याच्या उत्तरार्धात कमाई मध्ये भर पडेल. विद्यार्थ्यांना चांगले यश लाभेल. उपाय म्हणून मुलींची सेवा करणे २०१४ मध्ये अनुकूल ठरेल.

मिथुन राशीभविष्य २०१४

ज्यांची रास मिथुन आहे त्यांना २०१४ हे वर्ष सुखाचे जाईल. २०१४ मध्ये तुमच्या कुटुंबामध्ये एखादा महत्वाचा समारंभ पार पडण्याची शक्यता आहे. एखादा लग्नप्रसंग घडण्याचा किंवा नवीन अपत्य घरी येण्याचा प्रसंग असेल. परंतु, आरोग्यावर नजर ठेवावी. काही मोठे दुखणे नसले, तरी मोसमी आजारांपासून सावध राहावे. प्रेमाविषयी कोणत्याही बाबतीत आडमुठेपणा करू नये. अन्यथा, आपली प्रेमाची व्यक्ति दुसरीच कडे आकर्षित होऊ शकेल. २०१४ चे राशीभविष्य सांगते की या वर्षी तुम्ही अशा एका व्यक्तिला आकर्षित होऊ शकता, जी तुमच्या सामाजिक वर्तुळातील नसेल.

नोकरी व धंद्यासाठी हे वर्ष अनुकूल आहे. बेकारीपासून मुक्तता मिळेल, अथवा नोकरीत वृद्धी होईल. आर्थिक दृष्ट्या चांगला काळ आहे. २०१४ राशीभविष्य सांगते की तुमची उत्पन्नाची साधने वाढतील. परंतु धोकादायक गुंतवणुकीपासून सावधान असवे. विद्यार्थ्यांसाठीही २०१४ चांगले असेल, खास करून उच्च शिक्षणासाठी हा काळ अनुकूल आहे. देवळात जाऊन बदाम दान करावेत, त्याने सुख समाधान वधारेल.

कर्क राशीभविष्य २०१४

ज्यांची रास कर्क आहे, त्यांना २०१४ हे वर्ष संमिश्र फळे देईल. २०१४ राशीभविष्य सांगते की, वर्षाच्या पूर्वार्धात तुम्हाला काही अडचणींना सामोरे जावे लागेल. राहू व शनि चतुर्थ स्थानात असल्यामुळे तुमचे मानसिक संतुलन बिघडवू शकतील. २०१४ मध्ये तुमच्यात व तुमच्या कुटुंबियांमध्ये क्लेष निर्माण होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमच्यावर दडपण येऊ शकते. हा काळ आरोग्य, नोकरी, शिक्षण व प्रवास यांसाठी अनुकूल नाही. आपले स्वास्थ्य तुम्हाला सांभाळावे लागेल. २०१४ राशीभविष्य सांगते की, नोकरीतही बदल होऊ शकतील. वरिष्ठाबरोबर वाद टाळा, तसेच अनावश्यक प्रवासही टाळा. वर्षाचा उत्तरार्ध मात्र यापेक्षा बराच चांगला जाईल. तुमचे त्रास मिटू लागतील. २०१४ राशीभविष्य सांगते की, धार्मिक व आध्यात्मिक कार्य तुम्हाला सुख व शांती देतील. वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या शिक्षणाची पातळी वाढेल, व तुमचे उच्च शिक्षणाच्या दिशेचे प्रयत्न ही यश आणतील. पीडा कमी करण्यासाठी गाईला दुध मिश्रित भात घालावा.

सिंह राशीभविष्य २०१४

सिंह राशीच्या खाली जन्मलेल्यांना २०१४ चा पूर्वार्ध खूप सुखावह असेल. उत्पन्नाची साधने वाढतील. आप्तांचा व नातेवाईकांचा आधार लाभेल. २०१४ राशीभविष्य सांगते की, हा काळ अपत्य व शिक्षण – दोन्हीसाठी अनुकूल आहे. परन्तु, शनि पंचम स्थानात असल्यामुळे अपत्य-संबंधित ताण-तणाव जाणवतील, कालाबरोबर हे मिटतील देखील. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. २०१४ राशिभाविश्याच्या मते, प्रेम प्रकरण व अपत्य – दोन्हीसाठी हा काळ हितावह असेल. भरपूर श्रेयस्कर संधी तुमच्या वाट्याला येतील. व्यवसायात भरभराट होईल. बढती मिळण्याची संधी देखील येऊ शकते. विद्यार्थी आपल्या इच्छेच्या प्रवेश चाचण्यांमध्ये उत्तम यश मिळवतील. उत्तरार्धात मात्र खर्च वाढतील. तसेच, हा काळ आरोग्याच्या दृष्टीने हितकारक नाही. काही अनावश्यक प्रवास पत्करावे लागतील. उपाय म्हणून पिंपळाच्या झाडाला नियमित पाणी घालावे.

कन्या राशीभविष्य २०१४

२०१४ तुमच्यासाठी श्रेयस्कर वर्ष असेल. २०१४ मध्ये घरातील वातावरण सुखावह असेल. तुम्ही सुखी, समाधानी व निरोगी राहाल. परंतु जीभेवर ताबा ठेवणे शहाणपणाचे ठरेल. तसेच, अनावश्यक खर्च करू नयेत. खास करून, वर्षाचा उत्तरार्ध प्रेमासाठी व लग्नासाठी अनुकूल असेल. २०१४ राशिभाविश्यानुसार तुम्ही तुमच्या व्यवसायात काहीतरी अलौकिक करण्याचे संकेत दिसतात. बढती देखील शक्य आहे. २०१४ मध्ये तुमच्या वाट्याला येणाऱ्या संधी वाढतील. परंतु, शनि व राहू द्वितीय स्थानात आहेत. त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणे तुम्हाला कठीण जाईल. परंतु जुलै मध्ये राहूचे संक्रमण होईल, व त्यामुळे बचतीचे प्रमाण वाढेल तसेच आरोग्यावर हितकारक परिणाम होईल. २०१४ राशीभाविश्याच्या संकेताप्रमाणे विद्यार्थ्यांनाही चांगले यश लाभेल. कपाळावर शेंदूर लावावा, त्याने अधिक चांगली प्रगती होईल.

२०१४ हे वर्ष तुम्हाला संमिश्र निकाल देईल. आध्यात्मिक प्रवृत्तीचे असाल, तर घरात तुम्ही संतुलित वातावरण निर्माण कराल, कारण नवव्या स्थानातील गुरु तुमचे नशीब बलवत्तर करीत अहे. शनि व राहू प्रथम स्थानात असल्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतील. परंतु, जुलै मधल्या राहू संक्रमणानंतर स्वास्थ्य विषयक काळज्या मिटतील. हे वर्ष प्रेम विषयक बाबींसाठी अनुकूल आहे. परंतु, वैवाहिक जीवनात काही उतार चढाव येतील. २०१४ राशिभाविष्याचा सल्ला आहे की, फालतू दावे – खटले यांमध्ये अडकू नये, त्याने केवळ पैसा व वेळ खर्ची जाईल. व्यावसायिक पातळीवर देखील अडचणींना तोंड द्यावे लागेल. पण त्या अडचणींवर मात करून तुम्ही यश मिळवाल. सांपत्तिक दृष्ट्या, २०१४ हे साल सरासरीचे असेल. परिश्रम केल्यास विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेश जाऊ इच्छिणार्यांसाठी हा काळ अनुकूल अहे. उपाय म्हणून वानरांची सेवा करावी. तसेच मांसाहारी अन्न व दारू यांचे सेवन टाळावे.

वृश्चिक राशीभविष्य २०१४

२०१४ च्या सुरुवातीला गुरु तुमच्या कुंडलीच्या अष्टम स्थानात असल्यामुळे यश प्राप्तीसाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील. कुटुंबियांचा स्वभाव विचित्र वाटेल, असुरक्षिततेच्या भावनेमुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकेल. २०१४ राशिभाविश्यानुसार शक्यतो दावे – खटले टाळा. अनावश्यक प्रवासही तुमच्यासाठी हितकारक नाही. प्रेम संबंधातही काही बेबनाव येऊ शकतील. परिश्रमांना देखील हवे तसे फळ मिळणार नाही. परंतु, २०१४ चा उत्तरार्ध परिस्थितीत सुधारणा आणेल , कारण त्या काळात गुरु तुमच्या नवव्या स्थानात असेल. राहू तुमच्या कुंडलीच्या अकराव्या स्थानात जुलै महिन्यात पोहोचेल. या संक्रमणाने तुमच्या आयुष्यात सुधारणा येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे निकाल सुधारतील, तसेच उत्पन्नही सुधारेल. तूप व बटाटे यांचे दान हितकारक ठरेल.

धनु राशीचे भविष्य २०१४

२०१४ चा पूर्वार्ध तुमच्यासाठी फारच लाभदायक असेल. २०१४ राशीभविष्याच्या संकेतानुसार कुटुंबात सुसंवाद नांदेल. तुम्हालाही टवटवी आल्यासारखी वाटेल. शनि व राहू अकराव्या स्थानात असल्यामुळे तुमची प्रगती चांगली होईल. पण शनीच्या चढत्या स्थानावरच्या प्रभावामुळे तुमच्यात काही नकारात्मक भावना येऊ शकतात. तुमचा प्रयत्न नकारार्थी कार्य व वाईट सवयी टाळण्याचा असावा. २०१४ राशीभाविश्यानुसार तुम्हाला प्रेम व लग्नामध्ये अपेक्षित निकाल मिळतील. परंतु, शनिच्या पंचम स्थानातील प्रभावामुळे तुमच्यात व तुमच्या प्रेमाच्या व्यक्तिमध्ये वादविवाद होऊ शकतील. क्षुल्लक बाबींवर वाद टाळावा. व्यावसायिक दृष्ट्या समाधानकारक काळ. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे फळ मिळेल. परंतु वर्षाच्या उत्तरार्धात आयुष्याच्या प्रत्येक पैलूत अडचणी येऊ शकतात. गुंतवणुकी सावधानपूर्वक कराव्यात. झटपट पैसा कमावण्याच्या लुचपतीपासून सावध राहावे. नोकरपेशा माणसांनी देखील सावध राहावे. नोकरी बदलावी लागेल किंवा न आवडणाऱ्या जागी बदली होऊन जावे लागेल. दर चार महिन्यांनी वाहत्या पाण्यात नारळ सोडावेत, ज्यामुळे चांगली प्रगती होईल.

मकर राशीभविष्य २०१४

२०१४ तुमच्यासाठी कडूगोड ठरेल. या महिन्याच्या सुरुवातीलाच गुरु तुमच्या पंचम स्थानात संक्रमण करीत आहे. आर्थिक कार्यांमध्ये उतार-चढाव येतील. कर्ज संबंधित बाबींकडे बारीक लक्ष द्यावे लागेल. तुमच्या २०१४ राशीभविष्याप्रमाणे कुटुंबीयांबरोबर काही मतभेद होतील. तसेच, आरोग्यावरही परिणाम होतील. परंतु, रोगांनी तुम्ही त्रासणार नाही. काही वाद व खटले यांचेही संकेत आहेत. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असल्यामुळे तुम्हाला विजय प्राप्त होईल, अडचणींवर मात केल्यानंतर. तुमचे शत्रूही तुम्हाला त्रास देतील, परंतु अखेर विजय तुमचाच होईल. वर्षाच्या उत्तरार्धात लग्न केल्यास सुख प्राप्ती होईल. तुमच्या घरात एखादा मंगल प्रसंग घडण्याचे संकेत आहेत. भागीदारीत काम करीत असाल, तर फायदा निश्चित आहे. उत्पन्न व ज्ञान, दोन्ही या वर्षी वाढतील. पिवळ्या रंगांचे वस्त्र पुजाऱ्यांना दान केल्याने उन्नती होईल.

कुंभ राशीभविष्य २०१४

२०१४ ची सुरुवात तेजस्वी असेल. तुमच्या कुटुंबामध्ये काही मंगल प्रसंग पार पडतील. परिवार वृद्धीच्या दृष्टीने अनुकूल काळ. हा काळ शिक्षणाच्या दृष्टीनेदेखील फारच हितावह असेल. दूरचे प्रवास हितकारक ठरतील. आध्यात्मिक प्रवासांसाठी तर हा काळ खूपच अनुरूप आहे. चांगले आरोग्य तुमची साथ देईल, परंतु पथ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. नफे भरभरून वाढतील. शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे. परंतु वर्षाच्या उत्तरार्धात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. काहीजण कारणाशिवाय तुमच्या विरुद्ध जातील. कर्जांवरून देखील वाद-विवाद होऊ शकतील. मोठी गुंतवणूक टाळलेली बरी. जलमार्गाने प्रवास करणे टाळा. भात, गुळ व चणे यांचे देवळात दान करून नकारात्मक प्रभाव टळू शकतात.

मीन राशीभविष्य २०१४

साल २०१४ तुमच्यासाठी हितकारक ठरेल. जरी शनिच्या धैय्येचा प्रभाव तुमच्यावर पडेल, तरीदेखील गुरूची छत्रछाया तुमच्यावर राहील. घरात सुसंवाद नांदेल. चांगले आरोग्य तुमची साथ देईल. नवीन घर अथवा वाहन विकत घेण्यासाठी हा काळ चांगला आहे. २०१४ राशीभविष्यानुसार वर्षाचा उत्तरार्ध प्रेमसंबंध व लग्न यांसाठी अनुकूल आहे. परंतु जुलैनंतर राहू तुमच्या सप्तम स्थानात संक्रमण करेल व वैवाहिक जीवनामध्ये तणाव निर्माण करू शकेल. आपल्या धंद्यामधले भांडवल तुम्ही या वर्षी वाढवू शकता. वरिष्ठांचे आशीर्वाद लाभतील. बेत मांडताना काही नवीन उपक्रम देखील हाती घ्याल. उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत. भागीदारीत असलात तर सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ हितकारक आहे. उच्च शिक्षणाचे बेत आखणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष हितकारक ठरेल. खिशात चौकोनी चांदीचा तुकडा ठेवावा, ज्यामुळे अधिक फायदे मिळतील.

image

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.