चंद्र राशी आणि उपासना
चंद्र राशी आणि उपासना
आपली पत्रिका चांगल्या ज्योतिषाला दाखवून नेमकी कोणती उपासना करावी हे नीट समजून घेणे आवश्यक आहे.
कूळपरंपरेनुसार आपल्या कुलदेवताची पूजा / उपासना ही प्रथम आणि नंतर आपल्या राशी प्रमाणे उपासना करावी.
मेष:
गणपतीची उपासना, २१ विनायकी, २१ संकष्टी, २१ मंगळवार उपवास, श्रीगणपती – स्तोत्र वाचणे, गणपतीचे दर्शन घेणे. जमल्यास अष्टविनायक यात्रा करणे.
वृषभ:
देवी, व्यंकटेश उपासना, अष्टमी उपवास, देवीचे पाठ, मंगळवार, शुक्रवार उपवास. बालाजीचे दर्शन घेणे.
मिथुन:
पांडुरंगाची, विठ्ठलाची उपासना, एकादशी व्रत.
कर्क:
महादेव पूजन, शिवलीलामृत पठाण, सोमवार उपवास, संकट १६ सोमवार करणे.
सिंह:
श्रीरामपूजन, राम उपासना, श्रीरामरक्षा स्तोत्र रोज वाचणे, म्हणणे.
कन्या:
विठ्ठल, कृष्ण उपासना, एकादशी व्रत.
तूळ:
देवी, व्यंकटेश, बालाजी उपासना, विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र वाचणे.
वृश्चिक:
गणपती, देवी पूजन, गणेश स्तोत्र, लक्ष्मी पाठ वाचन.
धनु:
गुरुदत्त उपासना, गुरु बावनी, श्रीगुरुचरित्र वाचन, श्रीनवनाथ भक्तिसार वाचन, सत्यदत्त पोथी वाचन, गुरुवारी उपवास. दत्तस्थान दर्शन, पंचधातूच्या दत्ताची रोज पूजा.
मकर:
मारुती किंवा शनीची पूजा, दर शनिवारी मारुतीला तेलवात घालणे, ११ शनिवार तेलाचे दिवे चढते व अकरा शनिवार उतरते लावणे, रुईच्या पानांचा हार घालणे.
कुंभ:
मारुती, दत्त पूजन. वरील प्रमाणेच सर्व विधी.
मीन:
गुरुदत्त उपासना, गुरु बावनी, श्रीगुरुचरित्र वाचन, श्रीनवनाथ भक्तिसार वाचन, सत्यदत्त पोथी वाचन, गुरुवारी उपवास. दत्तस्थान दर्शन, पंचधातूच्या दत्ताची रोज पूजा.
आपला,
विक्रम आदित्य
खूप कष्ट घेऊन एखादी गोष्ट लिहिलेली असते, त्यामुळे कोणतीही गोष्ट कट – पेस्ट – कॉपी करताना विचार करा! जनाची नसली तरी थोडीशी मनाची लाज ठेवा!