श्रीशिवलीलामृत – सप्ताह-पारायण पध्दति – Shivalilamrut

भगवान महादेवाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे.

सप्ताह-पारायण पध्दति

कोणत्याही सोमवारी सायंकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन १०१ बेलाची पाने पिंडीवर वहावीत व महादेवाचे यथाशास्त्र दर्शन घेऊन ” मी महादेवला प्रसन्न करून शांति, समाधान, आनंद, सुख आणि समृद्धी (जी इष्ट कामना असेल ती बोलून) प्राप्त करण्यासाठी श्रीशिवलीलामृत पोथीचे ७ दिवसात पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान् महादेवांनी कृपा करून माझ्याकडून पूर्ण करून घ्यावे.” अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वत:च्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचायला सुरुवात करावी.

प्रथम काही वेळा २-३ अध्याय वाचून पाहावेत. मग जर व्यवस्तीत पूर्णतः पोथी वाचता येणार असेल तरच संकल्पना करावी.

शूचिर्भूत असावे. पांढरे वस्त्र धारण करावे. स्वच्छ ठिकाणी बसून किवां देव्हारा असेल तर किवां महादेवाच्या तस्वीरी समोर बसून वाचन सुरु करावे. घरात शांतता असावी. 

वाचन करताना दहा वेळा उठू नये आणि जांभया देऊन आळस देऊ नये. झोप आली असल्यास झोप घ्यावी आणि पूर्णतः फ्रेश होऊन पुन्हा वाचनास बसावे. अतिशय एकाग्राचीत्तीने वाचन झाले पाहिजे. 

  1. सोमवार – अध्याय १अध्याय २ 
  2. मंगळवार – अध्याय ३अध्याय ४
  3. बुधवार – अध्याय ५अध्याय ६
  4. गुरुवार – अध्याय ७ अध्याय ८
  5. शुक्रवार – अध्याय ९अध्याय १०
  6. शनिवार – अध्याय ११अध्याय १२
  7. रविवार – अध्याय १३अध्याय १४
  8. रविवारी रात्री अध्याय १५ वाचला तरी चालेल.

रविवारी रात्रीच्या आपल्या जेवणाच्या पात्राचा नैवेद्य महादेवाला दाखवावा व तेच उद्यापन समजावे.

पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. रविवारी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवापुढे  तांदूळ ठेवावेत आणि नारळ अर्पण करावा.

देवळात जर साधू असेल तर किवां गुरुजी असतील तर त्यांना कमीत कमी २०१ रु. दक्षिणा व पांढरेशुभ्र वस्त्र दान करावे.

प्रत्येक अध्याय मोठ्यांदा वाचला तरी चालेल.  इतरांनीही ऐकावी.

रविवारी वाचन पूर्ण झाल्यावर १००८ वेळा ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करावा ( जमल्यास रोज जप करावा )

त्याचबरोबर जर महामृत्युंजयचा जप करता आला तर उत्तमच आहे. १०८ वेळा कमीत कमी.  

आपला,

विक्रम आदित्य 

ipv-linkedin

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.